Simmba Trailer : रणवीर सिंह मराठमोळ्या अवतारात....

मुंबई : रणवीर सिंहला कायम पीरियड सिनेमात पाहिल्यानंतर आता तो चाहत्यांना हटके अवतारात दिसणार आहे. बाजीराव आणि खिलजी साकारल्यानंतर आता पोलिसांच्या रूपात रणवीर दिसणार आहे. सिंबाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लग्नानंतर रिलीज होणारा रणवीर सिंहचा हा पहिला सिनेमा आहे. 

रोहित शेट्टी दिग्दर्शिक या सिनेमात सारा अली खान-रणवीर ही जोडी पाहायला मिळणार आहे. एकाच महिन्यात रिलीज होणारी साराची ही दुसरी फिल्म आहे. या अगोदर डिसेंबरमध्ये केदारनाथ या सिनेमातून साराने डेब्यू केला आहे. 

रोहित शेट्टी म्हटलं की अॅक्शनने भरलेला सिनेमा. याची झलक सिम्बाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. रोहित शेट्टीचा ट्रेडमार्क असलेली कारची स्टाइल या ट्रेलरमध्ये देखील पाहायला मिळाली. 

या सिनेमात रणवीर अजय देवगनच्या सिंघम या सिनेमाने प्रभावित होतो. अजय देवगन या मराठी पोलिसवाल्यासोबत रोहितने सिंघम आणि सिंघम 2 सारखे हिट सिनेमे दिले आहेत. आता या सिनेमातही रणवीर सिंहचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x