श्रेया घोषालच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

 घोषाल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

Updated: May 23, 2021, 08:20 AM IST
श्रेया घोषालच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई : आपल्या आवाजने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे घोषाल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. श्रेयाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. श्रेयाने ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर श्रेयाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. याआधी अशी  भावना कधीच अनुभवली नव्हती. मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद..' असं म्हणतं तिने आनंद व्यक्त केला. 

श्रेयाने 2015मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केलं.  शिलादित्य मुंबईतील एका  एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहेत. श्रेया कायम सोशल मीडियावर पतीसोबत फोटो पोस्ट करत असते.