प्रतिक बब्बरला एवढ्या वर्षानंतरही प्रत्येक क्षणी आई दिसते

प्रतिक बब्बरला एवढ्या वर्षानंतरही प्रत्येक क्षणी आई स्मिता पाटील दिसते...मग तो आईला या माध्यमातून भेटतो

Updated: Apr 27, 2021, 04:14 PM IST
प्रतिक बब्बरला एवढ्या वर्षानंतरही प्रत्येक क्षणी आई दिसते

मुंबई : अभिनेत्री स्मिता पाटील यांनी कायमच आपल्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमु्ग्ध केलं आहे. पण ही उत्कृष्ठ अभिनेत्री प्रेक्षकांना खूप कमी वयातच सोडून गेली. आजही स्मिता पाटील हिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. असं असताना तिचा मुलगा अभिनेता प्रतिक बब्बरने खास आठवण शेअर केली आहे. 

प्रतिक बब्बरने आपल्या आईच्या नावाचा टॅटू काढून तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्याला माहित आहे की, प्रतिकने अनेक टॅटू काढले आहेत. पण हा टॅटू त्याच्या अगदी जवळचा आहे. प्रतिकने हा टॅटू चक्क आपल्या हृदयावर काढला आहे. 

inked my mother’s name on my heart.. smita #4ever  1955 -

Posted by Prateik Babbar on Tuesday, April 27, 2021

प्रतिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की,'inked my mother’s name on my heart.. smita #4ever 1955 - ' प्रतिक म्हणतो,'माझ्या आईचं नाव माझ्या हृदयावर... स्मिता कायमच 1955 आणि त्यापुढे त्यानी इन्फिनीटची इमोजी देखील पोस्ट केली आहे. महत्वाचं म्हणजे स्मिता हे नाव त्यांनी इंग्रजीत लिहिलं आहे. शेवटचा A हा स्टारमध्ये लिहिला.'

या फोटोत आपण बघू शकतो प्रतिकने अनेक टॅटू काढले आहेत. पहिला टॅटू त्याच्या मानेवर आहे. दुसऱ्या टॅटू  त्याच्या डाव्या हातावर आहे. तिसरा टॅटू जो स्मिता पाटीलचं नाव आहे. आणि उजव्या हाताच्या बोटांवर देखील त्याने टॅटू काढले आहेत. 

अनेकांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. स्मिता पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी आईला यापेक्षा चांगली श्रद्धांजली काय असेल?असं म्हणतं त्याचं कौतुक करत आहेत.