अभिनेत्री स्मिता तांबेने दिली चाहत्यांना गुडन्यूज

अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या अभिनयाच्या शैलीतून घराघरांत पोहचली. 

Updated: Jul 31, 2021, 03:18 PM IST
अभिनेत्री स्मिता तांबेने दिली चाहत्यांना गुडन्यूज

मुंबई : अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या अभिनयाच्या शैलीतून घराघरांत पोहचली. नुकतीच स्मिताने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या स्मिताची जिवाभावाची मैत्रीण आणि डान्स कोरिओग्राफर फुलवा खामकरने स्मिताच्या बेबी शॉवरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत 'कामिनी प्रताप साटम' ही भूमिका साकारणारी स्मिताने मराठी प्रमाणे हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे 

स्मिता आणि तिचा पती धीरेंद्र द्विवेदी यांनी पारंपारिक बेबी शॉवर पार्टी अरेंज केली होती. व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप खुश दिसत आहे. व्हिडिओमध्ये, तिच्या मैत्रिणी आणि अभिनेत्री रेशम टिपणीस, अदिती सारंगधर, अमृता संत आणि फुलवा खामकर पारंपारिक महाराष्ट्रीयन 'डोहाळे जेणणाचा आनंद घेत आहेत. लोकप्रिय मराठी गाणं 'कुणीतरी येणारं येणार गं' यावर डान्स सगळ्या डान्स करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कुटुंबीयांनी आणि मित्र-मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली. यावेळी स्मिताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. स्मिताने ही गूडन्यूज देवून चाहत्यांना आश्चर्य चकित केलं आहे. स्मिताने यापूर्वी, '72 मैल एक प्रवास', 'जोगावा', 'बायेस्कोप', 'गणवेश', 'ट्रकभर स्वप्न', सारख्यां अनेक हिट सिनेमा दिले आहेत. या व्यतिरिक्त स्मिताने लाडाची मी लेक गं या मालिकेत डॅशिंग मम्मीची भूमिका साकारुन सगळ्या चाहत्यांची मनं जिंकली होती.