कोण आहे स्नेहा वाघ? दोन तुटलेल्या लग्नांविषयी म्हणाली...

दोन लग्न तुटल्यानंतर स्नेहा आणि डान्सर फैझल खानच्या नात्याची चर्चा

Updated: Sep 22, 2021, 11:57 AM IST
कोण आहे स्नेहा वाघ? दोन तुटलेल्या लग्नांविषयी म्हणाली...

मुंबई : सध्या सर्वत्र मराठी बिग बॉसची चर्चा रंगली आहे. अनेक चेहरे  बिग बॉसच्या माध्यमातून आता समोर आले आहेत. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघ. बिग बॉसमुळे स्नेहा पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात स्नेहाने दोन तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितलं. यावेळी तिने तुटलेल्या लग्नाबद्दल खुलासा केला. तर जाणून घेवू तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल. वयाच्या 19 व्या वर्षी तिने अविष्कार दार्वेकरसोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. 

घटस्फोट घेत असताना तिने अविष्कारवर घरगुती हिंसा होत असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर स्नेहाने दुसरं लग्न अनुराग सोलंकीसोबत केलं. पण दोघे आता  विभक्त झाले आहेत. लवकरचं दोघे घटस्फोट घेणार आहेत. एवढंच नाही तर स्नेहाचं नाव तिच्यापेक्षा 11 वर्ष लहान डान्सर फैझल खानसोबत जोडण्यात आलं. 

फैझलची गर्लफ्रेंड मुस्कान कटारियाने स्नेहा आणि फैझल एकमेकांना डेट करत असल्याचे आरोप केले. दरम्यान, फैझल आणि स्नेहा दोघांनीही या चर्चांना पूर्णपणे नकार दिला. स्नेहा म्हणाली होती- 'यावर काही बोलायचे नाही. माझ्या आयुष्यात माझे मित्र असू शकत नाहीत का? फैझल हा माझा मित्रच नाही तर कौटुंबिक मित्र आहे. 

स्नेहा पुढे म्हणाली, 'मी त्या मुलीला अजिबात ओळखत नाही. मी बऱ्याच वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि मला माहित आहे की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. पण अखेरीस फक्त आणि फक्त हार्ड वर्कचं आपल्याला यश मिळवून देतं. मला कळत नाही माझं नाव पब्लिसिटी स्टंटसाठी का वापरतात? असा प्रश्न देखील स्नेहाने उपस्थित केला.