close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून मला धोनी आवडतो- सनी लिओनी

धोनीचा एकही सामना पाहायला ती विसरत नाही. 

Updated: Mar 15, 2019, 01:40 PM IST
  ...म्हणून मला धोनी आवडतो- सनी लिओनी

मंबई : नेहमी चर्चेत असणारी सनी लिओनीच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमाच्या दरम्यान सनीने तिच्या आवडत्या खेळाडूविषयी खुलासा केला आहे. तिचा आवडता खेळाडू कोणी दुसरा नसून भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आहे. धोनी हा तिचा आवडता खेळाडू असून, त्याचा एकही सामना पाहायला ती विसरत नाही. महेद्रं सिंह धोनी धावपट्टीवर आल्यानंतर तिच्यासाठी महत्त्वाचे काहीच नसते. असेही तिने त्या कार्यक्रमात सांगितले. परंतू काही कारणांमुळे तिला मैदानात सामना बघायला जाता येत नाही, अशी खंत व्यक्त केली. धोनी का आवडतो? या प्रश्नावर सनीचे उत्तर ऐकून सर्व थक्क झाले. 

एका कार्यक्रमाच्या दरम्यान आलेल्या सनी लिओनीने तिच्या आवडचा खेळाडू म्हणून धोनीचे नाव घेतले. परंतु धोनी का आवडतो विचारल्यास तिने खुप सुंदर आणि आश्चर्यजनक उत्तर दिले. महेंद्र सिंह धोनी हा त्याच्या अंदाजामुळे प्रेक्षकांना आवडतो. सनीला धोनी आवडतो याचे कारण त्याची मुलगी झिवा आहे. झिवा ही सनीला  आकर्षित करते, कारण ती खुप गोड असल्याचे सनीने सांगितले. आयपीएलचे सामन्यात झिवाला अनेकदा पाहायला मिळतं असेही तिने सांगितले. तसेच धोनी आवडण्यामागचे दुसरे कारणही सनीने सांगितले. धोनी हा त्याच्या परिवाराची योग्य काळजी घेताना दिसतो. यामुळे सनीने धोनीला 'परफेक्ट फॅमिली मॅन' म्हणून संबोधले आहे.