आर्यन खान जेलमधून सुटल्यानंतर सुहाना खानची जंगी पार्टी

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान खूप आनंदात आहेत.

Updated: Oct 31, 2021, 07:13 PM IST
आर्यन खान जेलमधून सुटल्यानंतर सुहाना खानची जंगी पार्टी title=

मुंबई : ड्रग्ज क्रूझ प्रकरणात बरेच तुरुंगात असलेला बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर जामीन मिळाला आहे. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान खूप आनंदात आहेत. त्याचबरोबर आर्यन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शाहरुख खानची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेशन करत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. नुकतीच ती तिच्या मैत्रिणींसोबत हॅलोवीन सेलिब्रेट करताना दिसली.

सुहानाच्या पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती बॅक-अप टाय-अप असलेल्या बेबी ब्लू ड्रेसमध्ये खूपच गोंडस दिसत आहे. या फोटोंमध्ये तिच्यासोबत तिची मैत्रिणी प्रियंका आणि रैनाही दिसत आहेत. सोशल मीडियावर पार्टीतील फोटो शेअर करत, तिची मैत्रिण प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सूर्यप्रकाशाने भरलेला खिसा सापडला!" त्याचवेळी या फोटोवर कमेंट करताना सुहानाने ‘आय लव्ह यू’ असं लिहिलं.

सुहाना बऱ्याच आठवड्यांत पहिल्यांदाच दिसली आहे. तिचा भाऊ आर्यन खानला मुंबईत ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लो प्रोफाइल राखलं आहे. तिने या महिन्यात फक्त तीन वेळा तिच्या अकांऊन्टमधून पोस्ट शेअर केली. पहिली शाहरुख आणि गौरीला त्यांच्या लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी, दुसरं आर्यनला जामीन मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तिसरा तिच्या जिवलग मैत्रीण अनन्या पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी.