आईसोबत सोशल मीडियावर फोटोशेअर करताच हृतिक रोशन ट्रोल, म्हणाले,"ही कसली श्रीमंती?"

सध्या हृतिक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तो एक वेगळ्याच कारणाने. 

Updated: Sep 15, 2021, 05:00 PM IST
आईसोबत सोशल मीडियावर फोटोशेअर करताच हृतिक रोशन ट्रोल, म्हणाले,"ही कसली श्रीमंती?" title=

मुंबई : हृतिक रोशनहा बॉलिवूडमधील एक असा स्टार आहे जो. खूप मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून फारच लांब राहण्याचा प्रयत्न करतो. हृतिक तसा सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो, परंतु तो बॉलिवूडच्या मोठ्या पार्ट्या किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये फारसा दिसत नाही. त्यामुळे तो सगळ्या चर्चेपासून लांबच राहातो. 

परंतु सध्या हृतिक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तो एक वेगळ्याच कारणाने. ट्विटरवर हृतिकने आता त्याच्या आईसोबत एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. पण आता सोशल मीडिया यूजर्सनी त्याला या फोटोमुळे ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, या फोटोत असं ट्रोल करण्यासारखं काय असू शकतं? तर तुम्ही हा फोटो निट पाहा.

खरेतर ट्विटरवर त्याच्या आईसोबत एक फोटो शेअर करत हृतिक रोशनने कॅप्शनमध्ये लिहिले, "आईसोबत लेझी नाष्टा आळशी नाश्ता." त्याच्या या फोटो पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. वास्तविक, ही चर्चा हृतिकच्या मागे असलेल्या पांढऱ्या भिंतीबद्दल होत आहे. यासाठी त्याला सोशल मीडिया यूजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका यूजरने लिहिले आहे, 'हे पाहून बरे वाटले की, भिंतीची समस्या श्रीमंतांनाही आहे.' दुसऱ्या एका यूजरने फोटोत एक वर्तुळ करुन लिहिले की, 'सर, आता ते रंगवा.'

अनेक वापरकर्त्यांनी हृतिकला सल्लाही दिला आहे. एकाने लिहिले आहे, 'सर, श्रीमंतांची काळजी घ्या, भिंत लवकर दुरुस्त करा नाहीतर, लोकांचा पैशावरील विश्वास उडेल.'