आईसाठी शेवटच्या क्षणी मुलानं म्हटलं गाणं...'मेरा तुझ से है पहले का नाता कोई'

मुलाने आईला दिला अखेरचा निरोप 

Updated: May 14, 2021, 11:40 AM IST
 आईसाठी शेवटच्या क्षणी मुलानं म्हटलं गाणं...'मेरा तुझ से है पहले का नाता कोई'

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशावर संकट ओढावलं आहे. अनेकांना आपल्या माणसांपासून दूर केलं आहे. त्याहून मोठं दुःख म्हणजे आपल्या माणसाला शेवटच्या क्षणी देखील निरोपही देता येत नाही. कारण कोरोनाच्या या महामारीत अशी परिस्थिती आली आहे. अशा कठीण प्रसंगी ट्विटच्या माध्यमातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आईला तिच्या मुलाने अखेरचा निरोप दिला तो ही गाणं गाऊन. 'तेरा मुझसे हे पहले का नाता कोई..' हे गाणं गाऊन मुलाने आईला शेवटचा निरोप दिला. डॉ. दीपशिखा घोष सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. त्यांना 12 मे रोजी ट्विटरवर एक माहिती दिली.

ज्यामध्ये दीपशिखा घोष सांगतात की,'आज माझी शिफ्ट संपायच्या आत कोविड रूग्णाच्या मुलाने फोन केला. कारण ती रूग्ण वाचू शकेल की नाही यामध्ये शंका निर्माण झाली नव्हती. आम्ही हॉस्पिटलमध्ये अशी वेळ आली की रूग्णांच्या नातेवाईकांना फोन करते. कोविड रूग्णाच्या मुलाने माझ्याकडे एक मिनिट मागितलं. त्याने आपल्या आईला अखेरच्या क्षणी एक गाणं गायलं.'

डॉक्टरने लिहिलं आहे की,'त्या मुलाने 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...' हे गाणं गायलं आहे. मी तेथे फोन पकडून उभी होती. त्याची आई मुलाला गाताना पाहत राहिली. नर्स जवळ जाऊन शांत उभी होती. गाणं गाता गाता त्या मुलाचे स्वर उडखळायला लागले. मात्र त्याने संपूर्ण गाणं गायलं. त्याने मला त्याच्या आईबद्दल विचारलं. आभार मानले आणि कॉल कट केला.'ॉ

दीपशिखाने पुढे म्हटलं की, 'मी आणि नर्स तेथेच उभे राहिलेत. मी फक्त मान हलवली. आमचे डोळे पानावले होते. त्यानंतर नर्स एक एक एक करून इतर रूग्णांजवळ गेली. या गाण्याने आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.'