मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार प्रियंका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. सोशल मीडियावर सातत्याने ऑटोबायोग्राफी 'अनफिनिश्ड' (Unfinished) यावर चर्चा झटत आहे. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलघडली आहेत, पण आता तिने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने आता हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. आता न्यूयॉर्कमधील लोकांना भारतीय चव चाखायला मिळणार आहे. प्रियंकाने न्यूयॉर्कमध्ये एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे.
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने आपल्या चाहत्यांसह नवीन रेस्टॉरंट उघडण्याची चांगली बातमी शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करुन ही माहिती दिली. या छायाचित्रांमध्ये ती पती निक जोनासबरोबर (Nick Jonas) पूजा करताना दिसली आहे. प्रियांकाची ही पोस्ट पाहा ...
पहिल्या फोटोमध्ये प्रियंका चोप्राने तिच्या भारतीय चवीनुसार या रेस्टॉरंटचे नाव दर्शविले आहे. तिने आलिशान रेस्टॉरंट नाव Sona ठेवले. हे नवीन काम सुरु करताना तिने भारतीय खाद्याप्रतीबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. आता प्रियंकाच्या या नवीन व्यवसायाबद्दल लोकांनी तिचे मनापासून अभिनंदन केले आहे.
प्रियंका चोप्रानेही ही छायाचित्रे शेअर करताना एक चांगला संदेश दिला आहे. तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्यासमोर Sona सादर करण्यास मला खूप उत्साह आणि आनंद वाटत आहे. न्यूयॉर्कमधील हे एक नवीन रेस्टॉरंट आहे. जिथे मी भारतीय खाद्यपदार्थ मनापासून देणार आहे. भारतीय खाद्याप्रती माझे खूप प्रेम आहे. Sona हे मी वाढवलेल्या भारतीय फ्लेवर्सचे प्रतीक आहे. शेफ म्हणून हरी नायक हे स्वयंपाकघर चालवतील. त्यांनी एक अतिशय चवदार आणि नाविन्यपूर्ण मेनू तयार केला आहे. जे तुम्हाला माझ्या भारतीय अन्नाची चव देतील. Sona हे आलिशान रेस्टॉरंट याच महिन्यात उघडत आहोत,असे प्रियंकाने सांगितले आहे.