मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा सिझन आहे. अभिनेत्री दीपिका अभिनेता रणवीरशी 14-15 नोव्हेंबर रोजी लग्न करत आहे. तर प्रियंका चोप्रा आणि निक जोनस 2 डिसेंबरला लग्न करत आहे. त्याचप्रमाणे कॉमेडीअन कपिल शर्मा देखील लग्न करत आहे. असं असताना आता दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या लग्नाबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे.
सोनाक्षीने याचा देखील खुलासा केला आहे की, तिला कोणत्या अभिनेत्यावर क्रश आहे. सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला असा नवरा हवा जो तिला बंधनात ठेवणार नाही. सोनाक्षीने असं देखील सांगितलं की, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्याशीच लग्न करा.
सोनाक्षीने या मुलाखतीत सांगितलं की, तिला कोणत्या अभिनेत्यावर क्रश होतं. हा अभिनेता आहे सुपरहिरो हृतिक रोशन. हृतिकचा कहो ना प्यार है हा सिनेमा पाहिला तेव्हाच तिला तो आवडू लागला होता. हृतिक रोशन सोनाक्षी सिन्हापेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे.
सोनाक्षी सिन्हा अभिनेता सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. मात्र या दोघांनी आपलं नातं कधीच ऑफिशिअल केलं नाही. आता या दोघांच ब्रेकअप झालं आहे.