सोनम कपूर करणार ३ हजार कोटीच्या मालकासोबत लग्न

आनंद हा ३ हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.

Updated: Apr 27, 2018, 04:57 PM IST
सोनम कपूर करणार ३ हजार कोटीच्या मालकासोबत लग्न  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही लग्नाच्या तयारीला लागले आहेत. नुकतीच तिने 'वीरे दी वेडींग' सिनेमाचे शूट पूर्ण केलयं. तिच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणासंदर्भातील बातम्या सध्या चर्चेत आहेत. ८ मेला ते लग्न करणार असल्याचे सांगण्यात येतयं. प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहुजा आणि सोनम कपूर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरमयान आनंद अहूजाच्या प्रॉपर्टीबद्दलची माहिती समोर आली आहे.  आनंद अहुजा हा दिल्लीतील एका शूज ब्रॅन्डचा मालक आहे. दोघांची करियर वेगवेगळी असली तरीही अनेक ठिकाणी त्यांची पसंत जुळते. आनंद हा ३ हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.

उत्तम बॉन्डिंग  

सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर आणि आनंद यांचीदेखील एकमेकांसोबत उत्तम बॉन्डिंग आहे. अनेकदा ते पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत. कपुर कुटुंबियांसोबत आनंददेखील अनेकदा दिसला आहे.

जूनमध्ये येणार 'वीरे दी वेडिंग' 

जून महिन्यात सोनमचा 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमादेखील येणार आहे. यामध्ये सोनम सोबत करिना कपूर, स्वरा भास्कर झळकणार आहे.सोनम आणि आनंद दोघेही फीटनेस फ्रीक आहेत, बास्केटबॉल खेळाचे ते शौकीन आहेत. काही दिवसांपूर्वी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडला स्पोर्ट्स बाईक बीएमएक्स गिफ्ट दिली होती.