Sonam Kapoor झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण

कपूर आणि अहूजा कुटुंबात नव्या पाहूण्याची एन्ट्री? सोनम कपूरचा रुग्णालयातील फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण   

Updated: Jul 11, 2022, 02:25 PM IST
Sonam Kapoor झाली आई? रुग्णालयातील फोटो व्हायरल होताचं चर्चांना उधाण title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोनम कपूर आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. प्रेग्नेंसीच्या चर्चांना आता सोनम कपूरने पूर्णविराम दिला आहे. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनमने ती गरोदर असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे. पण आता सोनमचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आई झाल्याचं दिसत आहे. 

फोटोमध्ये सोनम रुग्णालयात बेडवर झोपलेली दिसत आहे. सोनमच्या कुशीत एक नवजात बाळ देखील आहे. शिवाय आई झाल्याचा आनंद सोनमच्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसत आहे. 

पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो खोटा असून, फोटो एडीट केला आहे. सोनमने अद्याप तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिलेला नाही. कुटुंब आणि चाहते सोनंमच्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत. 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने चाहत्यांना आणि कुटुंबाला आनंदाची बातमी दिली. मार्च महिन्यात सोशल मीडियावर पती आनंद अहूजासोबत फोटो शेअर करत लवकरचं आई होणार असल्याची माहिती तिने चाहत्यांनी दिली. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला आणि आनंदला शुभेच्छा दिल्या. सोनम कपूर अहूजाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिच्या आगामी सिनेमाचं नाव ‘ब्लाइंड’ आहे. 2011 मध्ये आलेल्या कोरियन सिनेमा 'ब्लाइंड'चा रिमेक आहे. या सिनेमात सोनमसोबत पूरब कोहली, विनय पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.