बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी व्हिडीओतून रोस्ट करणाऱ्या एका युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. युट्बूरने सोनम कपूर, आनंद अहुजा आणि तिच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. हा ब्रँड उभा करण्यासाठी आम्ही फार मेहनत घेतली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. रागिनी असं या या युट्यूबरचं नाव आहे.
रागिनी या युट्यूबरने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये तिने सोनम कपूरच्या काही विधानांवरुन तिला रोस्ट केलं होतं. हा व्हिडीओ काही नेटकऱ्यांना फार आवडला असून, त्याच्यावक कमेंटही कर आहेत. त्यात आता सोनम कपूरचा पती आनंद अहुजाने युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठवून व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं आहे. नोटीसमध्ये बदनामीकारक टिप्पण्या, ऑनलाइन छळवणूक यांचा उल्लेख कऱण्यात आला आहे.
युट्यूबरला पाठवलेली नोटीशीत आनंद अहुजाने लिहिलं आहे की, त्याची पत्नी आणि तो अनेक ब्रँण्ड्सचे मालक आहेत. लोक त्यांचे ब्रँण्ड्स तसंच कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिष्ठेला धुळीस मिळवण्याचा प्रयत्न कत आहेत. ज्याचा त्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे, जी उभी करण्यात त्यांनी फार मेहनत घेतली आहे.
"ही बनावट पोस्ट बेकायदेशीर अशून, हा आमच्या आशील सोनम कपूर आहुजाच्या मालकीची सामग्री आहे," असं नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे. तसंच जर व्हिडीओ डिलीट केला नाही तर योग्य प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
युट्यूबर रागिनीने इंस्टाग्राम आणि युट्यूबरला ही नोटीस शेअर केली आहे. तसंच आपण जी वक्तव्यं दाखवली आहेत ती सोनम कपूरने जाहीर कार्यक्रमात केल्याचं सांगितलं आहे. "हा व्हिडीओ सोनम कपूरने केलेल्या तिच्या काही मूर्ख विधानांबद्दल होता. पण मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की, सोनम कपूरने जशी विधानं केली आहेत तशी आपणही नेहमीच्या आयुष्यात करतो. मूर्ख विधानं करणं ही सामान्य बाब आहे. मी तिचा अपमान कऱण्यापेक्षा तिचा बचाव केला आहे," असं स्पष्टीकरण रागिनीने दिलं आहे.
फक्त 7 हजार फॉलोअर्स असणाऱ्या युट्यूबरला नोटीस पाठवल्याने सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनाच नेटकरी ट्रोल करत आहेत. तसंच अनेकांनी युट्यूबरला पाठिंबा दर्शवत हा व्हिडीओ डिलीट करु नको असं सांगितलं आहे.