दीराच्या वाढदिवशी सोनम कपूरची खास पोस्ट; लेकाचा उल्लेख करत म्हणाली...

Sonam Kapoor Son Vayu Kapoor Face Revealed : सोनम कपूरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यामुळे तिची जोरात चर्चा असते. तिचा मुलगा वायू हा आता 1 वर्षाचा झाला आहे. आत्तापर्यंत तिनं आपल्या लेकाचा चेहरा दाखवलेला नाही. तोच आता तिच्या एका फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 29, 2023, 09:14 PM IST
दीराच्या वाढदिवशी सोनम कपूरची खास पोस्ट; लेकाचा उल्लेख करत म्हणाली... title=
Sonam Kapoor Son Vayu Kapoor Face Revealed photo goes viral on instagram

Sonam Kapoor Son Vayu Kapoor Face Revealed : सोनम कपूरचा मुलगा हा एक वर्षांचा झाला आहे. परंतु अद्यापही सोनमनं आपल्या मुलाचा चेहरा पुर्णपणे दाखवलेला नाही. परंतु नुकत्याच केलेल्या तिच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी तिनं पुर्ण नाही परंतु वायुचा अर्धवट चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्याच्या या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 20 ऑगस्ट 2022 साली सोनमच्या मुलाचा जन्म झाला. वायू कपूर आता एक वर्षाचा झाला आहे.

वायूचे फोटो सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूजा हे अनेकदा शेअर करताना दिसतात परंतु आपल्या लेकाचा पुर्ण चेहरा ते काही दाखवत नाहीत. अनुष्का शर्मा, आलिया भट्ट यांनी देखील सोनम कपूरप्रमाणे आपल्या मुलांचा जन्मल्यापासून नेटकऱ्यांना चाहत्यांना चेहरा न दाखविण्याचे ठरवले आहे. अनुष्काची मुलगी वामिका ही 3 वर्षांची होयला आली आहे. परंतु अद्यापही तिनं आपल्या लेकीचा चेहरा हा दाखवलेला नाही. 

आलियानंही राहाचा चेहरा दाखवलेला नाही. राहा आता पुढील महिन्यात वर्षाची होणार आहे. पापाराझींनी आलियाच्या मुलीचा अनेकदा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला परंतु रणबीर आणि आलियानं आपल्या लेकीचा फोटो काढायचा नाही यावर कडक भुमिका घेतली आहे. मध्यंतरी फोटोग्राफर्सनी आलियाच्या आणि राहाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत तिचे आणि राहाचे फोटो टिपले होते. त्यावर आलिया इन्स्टाग्रामवरून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. हीच भुमिका अनुष्का शर्मांनंही घेतली होती. त्यामुळे आपल्या मुलांचा चेहरा न दाखविण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांनी पाळला आहे. परंतु सोनम आता जसा जसा वायु मोठा होत जातो आहे त्यानुसार ती आपल्या लेकाचा चेहरा दाखवताना दिसते आहे. 

हेही वाचा : 'पैसे कुठून येतात; ना चित्रपट, ना मालिका?' सतत परदेशवाऱ्या पाहून नेटकऱ्याची खोचक कमेंट, मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी तिचा पती आनंद अहुजा याचा सख्खा भाऊ अनंत अहुजा याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात वायू त्याच्या मांडीवर बसून पुस्तक वाचताना दिसतो आहे. सोबतच त्याचा अर्धवट चेहराही पुस्तकाच्या आड येतो आहे. त्याचा हा गोंडस चेहरा पाहून नेटकऱ्यांनी त्याला लगेचच ओळखलं आहे आणि त्याच्या क्यूटनेसवरून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.