अखेर सोनम कपूरने दाखवली मुलाची पहिली झलक; तुम्ही पाहिला का फोटो?

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीपैकी एक आहे. लग्नाआधी तिने वेगवेगळ्या शैलीतील अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Updated: Oct 29, 2023, 07:15 PM IST
अखेर सोनम कपूरने दाखवली मुलाची पहिली झलक; तुम्ही पाहिला का फोटो?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीपैकी एक आहे. लग्नाआधी तिने वेगवेगळ्या शैलीतील अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. एका लाडक्या मुलाची आई सोनम कपूर चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या मुलाची झलक दाखवली नव्हती. मात्र आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.

सोनमने तिच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे
सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे कपल पहिल्या मुलाचे वायूचे पालक झाले. 'नीरजा' अभिनेत्रीने अनेकवेळा चाहत्यांना तिच्या मुलाची छोटीशी झलक दाखवली आहे. पण यावेळी अभिनेत्रीने तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. वायुचा फोटो पाहताच चाहते तिच्या क्यूटनेसचे कौतुक करताना दिसत आहेत.

वायू दिसला काकासोबत 
सोनमने मुलगा वायूचा आणि तिचा दीर अनंत आहुजासोबतचा फोटो शेअर केला आहे. याद्वारे सोनमने तिच्या दिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनंत या फोटोत एक पुस्तक वाचताना दिसत आहे. या पुस्तकाने वायूचा चेहरा अर्धा झाकलेला आहे, त्यामुळे त्याचा संपूर्ण चेहरा दिसत नाही. पण नाकापर्यंत वायूची झलक या फोटोत नक्कीच दिसतेय. दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वायूच्या क्यूटनेसवर चाहते फिदा  
भाऊ आणि मुलाचा फोटो पाहून आनंद आहुजाने कमेंटमध्ये हार्ट लव्ह इमोजी शेअर केला आहे. सोनम कपूरच्या फॅन पेजवर 'इंटरनेटवरील आजचं सर्वात सुंदर चित्र' अशी कमेंट करण्यात आली आहे.' अनिल कपूरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी लिहिलं, 'आमच्या कुटुंबातील म्यूझिकल मास्ट्रोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम आणि खूप सारं म्यूजिक'