मुंबई : सलमान खान स्टारर दबंग या सिनेमाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली. २०१०मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीही दर्शवली होती.
या सिनेमातून सोनाक्षी सिन्हा हिने मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली होती. तिचा पदार्पणाचा सिनेमाच ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाच्या प्रदर्शनाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सलमानचा सहअभिनेता सोनू सूदने एक गमतीशीर आठवण शेअर केलीये.
दबंगच्या क्लायमॅक्स सीनचे शूटिंग सुरु होते. यावेळी सलमानने अचानकपणे इतक्या जोरात माझ्या नाकावर ठोसा मारला की नाकातून रक्त वाहू लागलं होतं. मला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मी पुढील ५ ते ६ दिवस फुटलेल्या नाकासह शूटिंग करत होतो, असे सूद म्हणाला.
दबंग सिनेमात सोनू सूदने चेडी सिंग ही व्हिलनची भूमिका साकारली होती.