'Good News कधी देणार...', दाक्षिणात्य अभिनेत्रीचा 'तो' फोटो पाहून नेटकऱ्यांनी केला सवाल

Mahalakshmi आणि रविंद्र चंद्रशेखरन यांच्या लग्नापासून सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. आता तिचा बेडरूम फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. 

Updated: Jan 27, 2023, 01:18 PM IST
'Good News कधी देणार...', दाक्षिणात्य अभिनेत्रीचा 'तो' फोटो पाहून नेटकऱ्यांनी केला सवाल

South Actress Mahalakshmi and Ravindar Chandrasekaran : दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीनं (Mahalakshmi) निर्माता रवींद्र चंद्रशेखर (Ravindar Chandrasekaran) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेटकरी तिच्या लग्नावर सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हायरल झालेल्या फोटोंवर कमेंट करत काही नेटकरी हे त्यांचं खरं प्रेम आहे असे म्हणत ट्रोल केले. त्यानंतर आता महालक्ष्मीनं त्यांचा बेडरूममधील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 
 
महालक्ष्मी लग्नानंतर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच महालक्ष्मीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो बेडरूममधला आहे तर एक घरातील. हे फोटो शेअर करत महालक्ष्मीनं बेस्ट नाइट सूट असं कॅप्शन दिलं आहे. तिनं शेअर केलेल्या एका फोटोत भिंतीवर लहान मुलीचा एक ड्रेस असल्याचे दिसत आहे. ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला गूड न्यूज कधी देणार अशी विचारणा देखील केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महालक्ष्मीच्या लग्नाला चार महिन्यांहून अधिक काळ लोटला असून गेल्या वर्षी 2022 मध्ये तिनं रवींद्र चंद्रशेखरसोबत लग्न झाले. तिने पती रवींद्र चंद्रशेखरनवर खूप प्रेम केले. आता चाहते तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारत आहेत. महालक्ष्मीचा बेडरूममधील हा फोटो पाहिल्यानंतर एक नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की, आम्हाला हे सांग की तू गोड बातमी कधी देणार? बाळाला जन्म कधी देणार आहेस. तुझ्या या गोड बातमीची मी आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, साधेपणासाठी लोक ओळखले जातात. 

हेही वाचा : Fact Check : Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नावरुन वाद...सुनील शेट्टीनं केला मोठा खुलासा

दरम्यान, असे म्हटले जाते की महालक्ष्मीचे पहिल्या लग्नात वाद सुरु होते. त्यानंतर महालक्ष्मीनं पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर महालक्ष्मीनं निर्माता रवींद्र यांच्यासोबत लग्न करत सगळ्यांना सुखद धक्का दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महालक्ष्मी आणि रवींद्र यांची भेट 'विद्युम वरई कथिरू' चित्रपटादरम्यान झाली होती. या सेटवर त्यांची मैत्री झाली, त्यानंतर ते सतत भेटू लागले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, रवींद्रशी लग्न करत मी भाग्यवान आहे असे महालक्ष्मीनं म्हटलं. 

सतत होणाऱ्या ट्रोलिंगला पाहत असले तरी देखील महालक्ष्मी आणि रवींद्र एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी रविंद्रनं महालक्ष्मीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हा त्यानं कॅप्शन दिलं होत की 'माझ्या आयुष्यातील 8 वे आश्चर्य' यावर उत्तर देत महालक्ष्मीनं लोक काहीही म्हणत असले तरी, 'माझ्या हृदयाची धडधड होईपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. तुझ्याशिवाय मी नाही... तुच माझं सर्वस्व आहे.'