उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कंगनाला खास भेट

कंगनाने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; ती खास भेट पाहून सगळीकडे चर्चा

Updated: Oct 2, 2021, 11:13 AM IST
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कंगनाला खास भेट title=

मुंबई : शुक्रवारी अभिनेत्री कंगना रनौतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कंगनाला चांदीचे नाणे भेट म्हणून दिले. योगींनी कंगनाला जे नाणे भेट म्हणून दिले ते 'रामजन्म भूमी पूजन'साठी वापरले गेले. कंगनाने या भेटीदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या योगी आणि कंगनाची ही भेट तुफान चर्चेत आहे. कंगनाने फोटो शेअर करत भेटीचा अनुभव कॅप्शनच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

भेटीनंतर फोटो पोस्ट करत कंगना म्हणाली, 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटून खूप आनंद झाला. ते एक अतिशय नम्र आणि प्रेरणादायी व्यक्ती आहेत. एवढ्या लहान वयात असा प्रेमळ नेता मिळणे देशातील जनतेसाठी एक चांगली बाब आहे.' सध्या या भेटीची चर्चा सर्वत्र होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे कंगना म्हणाली,  'तेजस चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहकार्य केल्याबद्दल मी उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानते आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी शुभेच्छा देते...  पूर्वी आपल्याकडे उत्तर प्रदेशचे तपस्वी राजा श्री रामचंद्र होते आणि आता आपल्याकडे योगी आदित्यनाथ आहेत.... ' सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे.