पती बोनी कपूरसोबत श्रीदेवींचा हा शेवटचा डान्स व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हटली जाणारी श्रीदेवी यांचं दुबईत शनिवारी निधन झालं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 04:41 PM IST
पती बोनी कपूरसोबत श्रीदेवींचा हा शेवटचा डान्स व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हटली जाणारी श्रीदेवी यांचं दुबईत शनिवारी निधन झालं.

भावपूर्ण नजरेने आणि सुंदर हस्याने लोकांच्या मनात घर करणाऱ्या श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. 54 व्या वर्षी त्यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. यानंतर बॉलिवूडसह अनेकांना याचा धक्का बसला आहे.

श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. यातच त्यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये श्रीदेवी पती बोनी कपूर यांच्यासोबत एका सोहळ्यात डान्स करतांना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ 

 

Sridevi One Last Hug With Hubby Boney Kapoor #Rip #Sridevi #KhabriBhai

A post shared by KhabriBhai (@khabribhai) on