अभिनेत्रीच्या हातात champagne bottle आणि तिचा तो डान्स, सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री तिच्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेली दिसते

Updated: Mar 29, 2022, 08:48 PM IST
अभिनेत्रीच्या हातात champagne bottle आणि तिचा तो डान्स, सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : क्रिस्टल डिसूझाचं नाव छोट्या पडद्यावरील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिला पार्टीहोलिक मानलं जातं. तिला वेळ मिळताच, क्रिस्टल तिच्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेली दिसते. आता क्रिस्टलच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द क्रिस्टल डिसूझाने चाहत्यांसोबत शेअर केला असून तिच्या सेलिब्रेशनची झलकही दाखवली आहे.

शॅम्पेनच्या बॉटलमध्ये स्पार्कलर्स 
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही क्रिस्टलला पार्टी मोडमध्ये पाहू शकता. क्रिस्टलने तिच्या हातात शॅम्पेनची बॉटली धरली आहे. विशेष म्हणजे या शॅम्पेनच्या बॉटलमध्ये स्पार्कलर दिसत आहे. ही बॉटल हातात घेवून क्रिस्टल डान्स करताना दिसत आहे.  

क्रिस्टल डिसूजाचा लूक 
क्रिसल डिसूजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटिझन्सला तिची ही कूल स्टाइल चांगलाच आवडली आहे. क्रिस्टलच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी ती डीप नेकलाइन वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने हाफ पोनी आणि स्लिं बॅगसोबत तिचा पार्टी लूक पूर्ण केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्रिस्टल डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर  मोठा चाहतावर्गही आहे. क्रिस्टल दररोज तिचे एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.