मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रियावर आरोप करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचं कौतुक करण्यात आलं. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता पूर्णपणे कोलमडली होती. पण सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता खंबीरपणे उभी राहिली. रियाने अंकितावर आरोप केले होते की,अंकिता सुशांतची विधवा होण्याचा प्रयत्न करत आहे. यावर अंकिताने एक पोस्ट केली आहे. रियाचं नाव न घेतला तिला उत्तर दिलं आहे.
अंकिताने महिला शक्तीची हिंट देत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अंकिता साडी नेसून अगदी आनंदात आहे. त्यावर तिने कॅप्शन लिहिलं आहे की, मुली छोट्या छोट्या गोष्टींवर रडतात. मात्र आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रसंगाला अगदी हसत सामोरे जातात.
#powerofwomen महिला शक्तीचं अतिशय सुंदर पद्धतीने प्रदर्शन करत रियाला सडेतोड उत्तर दिलं आहे. सुशांतच्या मृत्यूला रिया जबाबदार असल्याचा अंकिताने संशय व्यक्त केला होता.
एका मुलाखतीत रियाने सुशांतच्या क्लोट्रोफोबिक असण्याचा दावा केला होता. तेव्हा अंकिताने सुशांतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये सुशांत क्लोस्ट्रोफोबिकच्या विरोधात वागत होता. तो विमान उडवण्याचा प्रयत्न करत होता. अंकिताने लिहिलं होतं की, स्वप्न काय असतात? क्लॉस्ट्रोफोबिया? तुला उंच भरारी घ्यायची होती आणि ते तू केलंस.