Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीबाबत कुटुंबियांचा मोठा निर्णय

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 6 दिवसांपासून ( Raju Srivastava hospitalized) रुग्णालयात आहेत. 

Updated: Aug 16, 2022, 04:44 PM IST
Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीबाबत कुटुंबियांचा मोठा निर्णय title=

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 6 दिवसांपासून ( Raju Srivastava hospitalized) रुग्णालयात आहेत. मात्र त्यानंतरही श्रीवास्तव यांची प्रकृती (Raju Srivastav Health Update) अजूनही नाजूकच आहे. कॉमेडी स्टारच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला चाहते आपल्या लाडक्या अभिनेता आणि कॉमेडी स्टारच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा आरोग्याबाबत नवी माहिती समोर आली आहे. या नव्या अपडेटमुळे चाहत्यांना चिंता काहीशी कमी होऊ शकते. मात्र राजू श्रीवास्तव अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत. (standup comedian and actor raju shrivastav aka gajodhar bhaiyya helath update family doctor taken big decision)

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती कशी?

ताज्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे. श्रीवास्तव यांच्या पर्सनल सेक्रेटरीने तब्येतीबाबतची अपडेट दिली आहे. राजू श्रीवास्तव यांची तब्येतीत आधीपेक्षा सुधार आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थन करतोय, अशी माहिती पर्सनल सेक्रेटरीने दिली.

श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे वैद्यकीय पथक श्रीवास्त यांच्याबाबत कोणतीही जोखीम घेत नाहीयेत. त्यामुळे डॉक्टरांकडून श्रीवास्तव यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नाहीये.

अजूनही व्हेंटिलेटरवरच

तर दुसऱ्या बाजूला श्रीवास्तव यांच्या जनसंपर्क अधिकारी अजित सक्सेना यांनी आरोग्याबाबत मोठी अपडेट दिलीय. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव अजूनही व्हेटिंलेटरवरच आहेत. त्यामुळे श्रीवास्तव यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच डॉक्टरांनी कुटुंबियांच्या सहमतीने मोठा निर्णय घेतलाय.

कुटुंबियांची सहमती, डॉक्टरांचा निर्णय

कुटुंबियांच्या सहमतीनंतर श्रीवास्तव यांना भेटायला कोणीच जाणार नाही, असा निर्णय डॉक्टरांनी खबरदारी म्हणून घेतला आहे. याशिवाय काही नातेवाईकांचे ऑडियो मेसेज श्रीवास्तव यांना ऐकावले जात आहेत. त्यामुळे श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचीतसा फरक आहे.