स्टार कपलने शेअर केला बेडरूम व्हिडिओ, पाठीवर लिहिला होता हा मॅसेज...

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार रॉशेल राव आणि किथ सिक्वेरा यांनी अलीकडेच त्यांचा बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Updated: Dec 11, 2021, 09:01 PM IST
स्टार कपलने शेअर केला बेडरूम व्हिडिओ, पाठीवर लिहिला होता हा मॅसेज... title=

मुंबई : अनेक स्टार्स सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी अजिबात संकोच करत नाहीत. या स्टार कपल्समध्ये प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार रॉशेल राव (Rochelle Rao) आणि किथ सिक्वेरा (Keith Sequeira) आहेत. हे दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी अनेकदा आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पण यावेळी या स्टार कपलने त्यांच्या बेडरूमचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये असे काहीतरी दिसले आहे ज्याचा तुम्हाला अजिबात अंदाज आला नसेल.

व्हिडिओमध्ये रॉशेल तिचा पती कीथसोबत झोपलेली दिसत आहे. कीथ त्याच्या फोनवर काहीतरी पाहत आहे, तर रॉशेल लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये कीथ फोनमध्ये काहीतरी बघताना दिसत आहे, त्यानंतर तो फोन बाजूला ठेवून रॉशेलला किस करतो. कीथला हे करताना पाहून रॉशेल रोमँटिक बनते.

या व्हिडिओमध्ये कीथ शर्टलेस आहे. रोशेलचे चुंबन घेतल्यानंतर कीथ पोटावर झोपतो. पोटावर झोपताच त्याच्या पाठीवर काहीतरी लिहिलेले दिसते. कीथच्या पाठीमागे लिहिले आहे - 'ही वेळ वापरा...'

हा व्हिडिओ स्वतः अभिनेत्री रॉशेलने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'सर्व कपल्स जे सध्या बाहेर आहेत... तुमच्यासाठी एक खास संदेश...'

रॉशेल आणि कीथ हे टेलिव्हिजनचे बोल्ड कपल आहे. या दोन स्टार्सनी अनेकदा पूलमधील तर कधी एकमेकांना लिपलॉक करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही स्टार्स 'बिग बॉस सीझन 9' मध्ये देखील दिसले आहेत. दोघेही त्यावेळी रिलेशनशिपमध्ये होते. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघांनी लग्न केले.