औरंगाबादमध्ये महिलांची तुफान गर्दी कशासाठी?

महिलांची गर्दी पाहून एकच चर्चा...

Updated: Apr 22, 2022, 04:38 PM IST
औरंगाबादमध्ये महिलांची तुफान गर्दी कशासाठी? title=

मुंबई : दार उघड बये दार उघड... असं म्हणत महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन बांदेकर भाऊजी आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली 18 वर्ष सन्मान करत आले आहेत. आता होम मिनिस्टरच 'महामिनिस्टर' हे नवीन पर्व  प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'महामिनिस्टर' कार्यक्रमात बांदेकर भाऊजी विजेत्या वहिनीला चक्क 11 लाखांची पैठणी देणार आहेत. या पैठणीला सोन्याची जरी असेल पण ही 11 लाखांची पैठणी कशी असेल ही पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे प्रेक्षक महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहेत.

होम मिनिस्टर या कार्यक्रमाने 18 वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या 18 वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही. लॉकडाऊनमध्येदेखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आहे. यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि 11 लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

या कार्यक्रमाच औरंगाबाद दौरा सध्या सुरुये. यावेळी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वहिनींनी भली मोठी रांग लावली. येथे झालेल्या तुफान गर्दीचा व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ पाहून  या कार्यक्रमाची महिलांमध्ये किती उत्सुकता आहे हे आपण या व्हिडिओवरुन लावूच शकतो. महिलांची ही गर्दी झी मराठी वरील महामिनिस्टर कार्यक्रमासाठी आहे.