VIDEO: कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी... करीना, सुहाना, कियाराला पाहून नेटकरी Upset?

Kareena Kapoor Suhana Khan Kiara Advani: कियारा अडवाणी, करीना कपूर आणि सुहाना खान यावेळी स्पॉट झाल्या आहेत परंतु त्यांना मात्र फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची जोरदार चर्चा रंगलेली आहे. परंतु आता त्यांच्याकडून अशी कोणती मिस्टेक झाली की त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Sep 1, 2023, 10:38 AM IST
VIDEO: कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तरी... करीना, सुहाना, कियाराला पाहून नेटकरी Upset?  title=
suhana khan kareena kapoor kiara advani gets trolled on their age difference

Kareena Kapoor Suhana Khan Kiara Advani: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. तिचा The Archies हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. या चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. हा चित्रपट पाश्चिमात्त्य कॉमिक्सवर आधारित आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा अभिनय पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात ती, करीना कपूर आणि कियारा अडवाणी या तिघी यावेळी स्पॉट झाल्या आहेत. परंतु यावेळी नेटकऱ्यांनी या तिघींनाही ट्रोल केलं आहे. यावेळी सुहाना, करीना आणि कियारा या तिघींनीही फार चांगल्या प्रकारे ड्रेस-अप केला होता. त्या तिघींनीही फार सुंदर असा गाऊन परिधान केला होता. यावेळी सुहानानं लाल, करीनानं काळा आणि कियारानं फिकट निळ्या रंगाचा वेलवेटप्रमाणे दिसणारा रॉयल लुकचा गाऊन परिधान केला होता. यावेळी त्या तिघींनीही पापाराझींसाठी पोझ दिली. 

'रिलायन्स तिरा' या ब्रॅण्डसाठी कियारा, करीना आणि सुहाना एकत्र जाहिरातीसाठी दिसणार आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. परंतु यावेळी मात्र त्या तिघींनाही ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्या तिघींच्याही ड्रेसिंग सेन्सवरून त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ''आजी, आई व नातं''. तर काहींनी कियारालाही ट्रोल केलं आहे. अनेकांनी या तिघींनाही फ्लॉप एक्ट्रेस असं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना त्यांच्या रॉयल लुकवरूनच हिणवलं आहे.

खरंतर बॉलिवूड सेलिब्रेटी हे अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. मध्यंतरी करीनानं गरोदर असताना रॅम्पवॉक केला होता. तेव्हा तिची खूप चर्चा रंगलेली होती. परंतु आई झाल्यानंतर तिच्या वाढलेल्या वजनामुळे मात्र तिला नेटकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. तिचे वय वाढू लागले आहे. आता तिनं चाळीशी पार केली आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही दिसू लागल्या आहेत, अशा प्रकारे तिची खिल्ली उडवण्यात आली होती. त्यातून करीना ही अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी सुहाना, करीना आणि कियारा एकत्र दिसल्यानं तर नेटकऱ्यांना आयती फोडणीचं मिळाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीना कपूर हिचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट फारच फ्लॉप गेला होता. त्यामुळे या चित्रपटाला झालेल्या विरोधामुळे तर बॉलिवूडचे संपुर्ण चित्रच पालटले होते. आता मात्र ती पुन्हा कोणत्या नव्या चित्रपटातून येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता ही लागून राहिली आहे.