सुहानाचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांचा 'हा' सल्ला

बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार किड सुहाना खान नेहमी चर्चेत असते.

Updated: Aug 26, 2019, 03:03 PM IST
सुहानाचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांचा 'हा' सल्ला title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार किड सुहाना खान नेहमी चर्चेत असते. बॉलिवूड किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान या अभिनेत्रींनंतर आता अभिनेता शाहरूख खानची मुलगी लवकरच अभिनय क्षेत्रात पाउल ठेवण्याची शक्यता आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते सुद्धा आहेत. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' या लघुचित्रपटाच्या माध्यमातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Press Triple Tap to Save the Picture 

A post shared by Suhana Khan (@suhanakhanteam) on

सध्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. सुहानाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने तिला लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.   

सुहानाने लंडनच्या 'Ardingly College'मधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. गतवर्षी सुहानाने तिच्या वडिलांच्या 'झिरो' या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. 

त्याचप्रमाणे रंगमंचावरील तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरूखच्या मुलीला अभिनयात आपली छाप पाडायची असून मुलाला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.