तिहार कारागृहातून जॅकलिनला फोन करायचा सुकेश चंद्रशेखर? नक्की काय आहे सत्य

 तपास यंत्रणेच्या हाती सुकेश चंद्रशेखचे तब्बल 24 पेक्षा जास्त कॉल रेकॉर्ड

Updated: Sep 1, 2021, 07:24 AM IST
तिहार कारागृहातून जॅकलिनला फोन करायचा सुकेश चंद्रशेखर? नक्की काय आहे सत्य title=

मुंबई : अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिस सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनला दिल्ली कार्यालयात बोलावून तिची सुमारे 5 तास चौकशी केली. चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तिहार कारागृहातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर, जॅकलिनला फोन करायचे असं समोर येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी आणखी कोणते खुलासे होतात हे पाहाणे महत्त्वाचं ठरणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की, सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगातून स्पूफिंगद्वारे जॅकलिनला फोन करायचे.

तो आपली ओळख सुकेश चंद्रशेखर न सांगता दुसऱ्या नावाने तिच्यासोबत संवाद साधत होते. जेव्हा जॅकलिन सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात अडकली तेव्हा तो तिला महागड्या वस्तू आणि फुल पाठवू लागले होते. आपल्याला फोन करणारा व्यक्ती तुरूंगात आहे याची जॅकलिनला काही कल्पना नव्हती.

 तपास यंत्रणांकडे सुकेशचे तब्बल 24 पेक्षा जास्त कॉल रेकॉर्ड आहेत. ज्याच्या आधारे तपास यंत्रणांना जॅकलीन फर्नांडिससोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली. तर दुसरीकडे सुकेश कोणत्या ओळखीने जॅकलिनसोबत संवाद साधायचे हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा तोच व्यक्ती आहे ज्याने AIADMK चे उपप्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून 2 कोटी रुपयांचे निवडणूक चिन्ह मिळवण्याचे आश्वासन दिले होते. प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली. अलीकडेच, सुकेशने तिहार कारागृहातून रेलिगेअर कंपनीचे प्रवर्तक मालविंदर आणि शिविंदर सिंग यांच्या पत्नींकडून सुमारे 200 कोटी रुपये उकळले होते. 

या प्रकरणात आरबीएल बँकेच्या अधिकाऱ्यांसह तिहार प्रशासनातील काही लोकांना अटक करण्यात आली. ईडीने सुकेशच्या जवळच्या सहकारी लीना पॉलचीही चौकशी केली. या प्रकरणात, काही दिवसांपूर्वी ईडीने चेन्नईतील बंगल्यावर छापा घातला, ज्याची किंमत कोटींमध्ये सांगितली गेली. छाप्यादरम्यान कारवाई करत ईडीने सुमारे 15 लक्झरी वाहने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त केली.