मुंबई : अभिनेता सुनील शेट्टी गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडचा भाग आहे. सुनीलने त्याच्या आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना केला. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली पण त्याच्या काही चित्रपटांना तुफान यश मिळालं तर काही चित्रपटांमात्र अपयशाचा सामना करावा लागला. सुनीलने 1992 साली 'बलवान' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'सपूत', 'क्रोध', 'हू तू तू', 'हेरा फेरी' आणि 'दस' चित्रपटांमध्ये काम केलं.
कालांतराने बॉलिवूडच्या ऍक्शन अभिनेत्यांच्या यादीत सुनीलच्या नावाचा समावेश झाला. अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगनसोबत सुनीलने स्टारडम पाहिलं. पण तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात असमर्थ ठरला. अक्षय-अजय प्रमाणे तो चाहत्यांच्या मनात घर करू शकला नाही. काही वर्षांनंतर तो सपशेल अपयशी ठरला.
यावर सुनील शेट्टी म्हणाला, 'एक काळ असा होता, जेव्हा करियरमध्ये अपयश वाट्याला येवू लागलं. त्या सुनील शेट्टीने विषयावर विश्वास दाखवला, पण मार्केटींगमध्ये मात्र फेल झाला.' मार्केटींग मुळे सुनिलच्या वाट्याला अपयश आलं असं म्हणायला हरकत नाही. आता लवकरच सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
सुनील म्हणला, 'माझ्या मुलाला देखील बॉलिवूडचा एक भाग बनवण्याची माझी इच्छा आहे. तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार देखील झाला आहे.' तर सुनील शेट्टीच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही दिसली.