सनी देओलला लहानपणापासून आहे 'हा' आजार; अजूनही शूटिंग दरम्यान होतो त्रास

Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला असलेल्या 'या' आजारा विषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 12, 2023, 12:47 PM IST
सनी देओलला लहानपणापासून आहे 'हा' आजार; अजूनही शूटिंग दरम्यान होतो त्रास title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत होता. 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. आता सध्या सनी हा त्याचा आगामी चित्रपट 'सफर' मुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याचं कारण म्हणजे मध्यांतरी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडीओत त्यानं मद्यपान केल्याचं दिसत होतं. मात्र, तो एक चित्रपटातील सीन होता हे अखेर स्पष्ट झालं होतं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं खुलासा केला की तो एका गंभीर आजाराचा सामना करत होता. इतकंच नाही तर किती वर्ष तो या आजाराचा सामना करत होता याचा खुलासा केला आहे. 

'बॉम्बे टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलनं सांगितलं की त्याला डिस्लेक्सिया नावाचा आजार होता आणि त्यानं अनेक वर्ष त्याचा सामना केला आहे. जेव्हा तो शाळेत होता तेव्हा त्याला हा आजार झाला होता. त्यामुळे तो चित्रपटाच्या सेटवर देखील थोडा चिंतेत रहायचा. डायलॉग बोलायला आणि त्याची डिलिव्हरी देताना त्याला त्रास व्हायचा. डिस्लेक्सिया आजारामुळे त्याला स्क्रिप्ट देखील वाचता येत नव्हती. त्यासोबत लिहायला देखील त्याला त्रास व्हायचा. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी  तो हिंदीमध्ये डायलॉग्स मागवायचा आणि अनेकदा वाक्य वाचायचा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आजाराविषयी कळताच लोक किती विचीत्र विचार करायचे याविषयी सांगितलं आहे. त्यांना वाटायचं की हे काहीच नाही आहे. जेव्हा तो याविषयी इतरांना सांगायचा तेव्हा त्याला मुर्ख असल्याचे लोक म्हणायचे. हे कळताच सनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा. सनी देओलनं याआधी देखील याविषयी सांगितलं आहे. 

हेही वाचा : 'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा

सनीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'गदर 2' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले होते. तर अमीषा पटेल या चित्रपट सनी देओलसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर : एक प्रेम कथा' 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर सनी लवकरच सफर आणि लाहौर 1947 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.