Tripti Dimari life after Animal's success : प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक चित्रपट असतो जो त्यांना एका रात्रीत फेम मिळवून देतो. त्या एका चित्रपटानंतर त्यांना मागे वळून पाहायची गरज भासत नाही. आता असं काहीसं एका अभिनेत्रीसोबत झालं आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी. तृप्तीविषयी बोलायचे झाले तर तिनं 'ॲनिमल' या चित्रपटात झोयाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर तृप्तीला खूप लोकप्रियता मिळाली तिच्या चाहत्यांच्या संख्येत एका रात्रीत वाढ झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्तीचा फोन सतत वाजतोय. या आधीच्या तिच्या चित्रपटांनी जे करून दाखवलं नाही ते या चित्रपटानं करून दाखवलं.
'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीनं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्यानंतर काय झालं याविषयी सांगितले आहे. तृप्ती म्हणाली 'माझा फोन सतत वाजतोय, माझी झोप उडाली आहे कारण तुम्हाला माहितीये की मेसेज वाचण्याची जी एक्सायटमेंट किंवा उत्साह असतो तो तुम्हाला रात्रभर जागं ठेवतो. तर सगळंच एकदम उत्तम सुरु आहे. मला जे काही प्रेम मिळतंय आणि खरं सांगायचं झालं तर हा एक खूप सुंदर अनुभव आहे.'
हेही वाचा : दाक्षिणेतील 'हा' सुपस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 210 कोटीचं मानधन!
'ॲनिमल' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगानं केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटानंतर त्या सगळ्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'ॲनिमल'नं 11 व्या दिवशी संपूर्ण देशात 443.27 कोटींची कमाई केली. तर हिंदी भाषेत या चित्रपटानं 400 कोटींची कमाई केली. तेलगु भाषेत चित्रपटानं 38.8 कोटींची भूमिका केली. तमिळ भाषेत या चित्रपटानं 3.43 कोटींची कमाई केली. कन्नड भाषेत या चित्रपटानं 56 लाख आणि मल्याळम भाषेत या चित्रपटानं 11 लाख कलेक्शन केलं आहे. सकाळच्या शोमध्ये थिएटरमध्ये 9.77 पर्सेंट आहे. तर दुपारच्या शोसाठी 18.80 पर्सेंट होते. संध्याकाळच्या शोसाठी 22.19 पर्सेंट आणि रात्रीच्या शोसाठी 29.17 पर्सेंट ऑक्युपेंसी होती. तर 11 व्या दिवशी या चित्रपटानं फक्त 13 कोटींची कमाई केली.