रविवार सनीसाठी पुन्हा लकी ठरला! 'गदर 2' नं ओलांडला 600 कोटींचा टप्पा; 'बाहुबली-2'लाही धोपीपछाड

Gadar 2 box office collection : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईनं अनेकांना आश्चर्य झाले असून त्यानं 'बाहुबली-2'लाही मागे टाकले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 4, 2023, 11:04 AM IST
रविवार सनीसाठी पुन्हा लकी ठरला! 'गदर 2' नं ओलांडला 600 कोटींचा टप्पा; 'बाहुबली-2'लाही धोपीपछाड title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 box office collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर 2' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी  प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 2001 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. आता 'गदर 2' नं कमाईच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. या चित्रपटानं 24 दिवसात 'बाहुबली 2: द कन्क्लूजन' या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. 

'गदर 2' नं 24 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करण्याच्या रेसमध्ये आहे. sacnilk नं दिलेल्या वृत्तानुसार, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कालपर्यंत 501.87 कोटींची कमाई केली होती. दरम्यान, या चित्रपटानं वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 24 दिवसात 655 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तीन दिवसातच 646.20 कोटींची केली होती. तर भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये त्यानं 582.20 कोटींची एकूण कमाई केली आहे. तर चित्रपटाचं नेट कलेक्शन हे 493.37 कोटी आहे. या चित्रपटानं 500 कोटी कमाई ही फक्त 24 दिवसात केली असताना, दुसरीकडे 'बाहुबली 2' नं 34 दिवसात ही कमाई केली होती. 

'गदर 2' नं बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या पठाण या चित्रपटाला टक्कर देण्याच्या शर्यतीत असल्याचं आपण बोलू शकतो. पठाणं भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 543.09 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाईड या चित्रपटानं 1050.05 कोटींची कमाई केली. पठाणला वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये खूप जास्त फायदा झाला. तर 'गदर 2' ला भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त फायदा झाला. त्या दोन्ही चित्रपटाच्या बजेटविषयी बोलायचे झाले तर पठाण या चित्रपटाचं बजेट हे 250 कोटींचं होतं तर 'गदर 2' चं बजेट हे 75 कोटींचं होतं. 

हेही वाचा : VIRAL VIDEO : भर रस्त्यात शाहिद कपूरनं केला तमाशा... पाहा कोणावर काढला राग

दरम्यान, लक्षवेधी गोष्ट म्हणजे आता लगेच 7 सप्टेंबर रोजी शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्या चित्रपटाचा परिणाम हा 'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जवानच्या प्रदर्शनानंतर सनी देओल आणि अमीषा पटेलच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तितकाच प्रतिसाद मिळेल का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.