VIRAL VIDEO : भर रस्त्यात शाहिद कपूरनं केला तमाशा... पाहा कोणावर काढला राग

Shahid Kapoor Angry Video Viral : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं कारण भर रस्त्यात शाहिद कपूरचं चिडणं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 3, 2023, 05:18 PM IST
VIRAL VIDEO : भर रस्त्यात शाहिद कपूरनं केला तमाशा... पाहा कोणावर काढला राग title=
(Photo Credit : Social Media)

Shahid Kapoor Angry Video Viral : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहिद सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. शाहिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ त्यानं शेअर केलेला नाही. तर या व्हिडीओत पापाराझींवर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. 

शाहिद कपूरचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिद कपूरला पाहताच पापाराझी जोर जोरात ओरडत त्याचं नाव घेताना दिसतात. यावेळी शाहिदसोबत त्याची पत्नी आणि कुटुंब देखील असतं. पापाराझींना ओरडताना पाहता शाहिद त्यांना म्हणाला, 'पागलसारखे का ओरडत आहेत? मी इथेच उभा आहे ना? मग असे पागलसारखे का ओरडत आहेत. शाहिद कपूर याचे हे बोलणे अनेक लोकांना आवडले नसल्याचे दिसत आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहिदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की एकदम बरोबर आहे. हे लोक असेच सेलिब्रिटींना त्रास देताना दिसतात. दुसार नेटकरी म्हणाला, बरं झालं. तिसरा नेटकरी म्हणाला, तुम्हाला असंच पाहिजे. आणखी एक नेटकरी म्हणाला, बरं झालं, ओरडला ते. आजकाल हे लोक जरा जास्त करतात. दुसरा नेटकरी म्हणाला, आज भाऊचा कबीर सिंग मूड आहे. 

हेही वाचा : बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय गायिकेचा फोननंबर लीक!

शाहिदच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी डॅजी या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. याशिवाय शाहिद लवकरच क्रिती सेननसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते. शाहिदनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुतनं म्हटलं होतं की तिला स्टार किड्स या शब्दाची चिड आहे. त्यामुळे ती देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.