ढेहराडून : पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिला पोट दुखीचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उत्तराखंडच्या उधम सिंग नगर जिल्ह्यातील ब्रिजेश हॉस्पिटल काशिपूरमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
उत्तराखंडमध्ये रिअॅलिटी शो एमटीव्ही स्पिल्ट्सविलची सीझन ११ च्या शूटिंग सुरु होती. त्याच दरम्यान तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार तिला अॅपेन्डिक्सचा त्रास आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार तिला शनिवारी डिसचार्ज देण्यात येईल.
तथापि, तिच्यावर उपचार करणारी डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले की, सध्या चांगली आहे. सनीची योग्य काळजी घेण्यात येत असून तिच्यावर औषधोपचार सुरु आहे. उद्या शनिवारी सकाळी तिला रुग्णालयातून सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
सनीला रुग्णालयात पोटाच्या आजारांमुळे दाखल करण्यात आली आहे. मात्र, आता तिची तब्बेत ठिक आहे. तिला डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले. ती आजारी असल्याने शूटिंग थांबविण्यात आलेय, असे एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.