सुशांत आणि अंकिता प्रेमात हरवले; पाहा कधीही न प्रदर्शित झालेला हा व्हिडिओ

अंकिता आणि सुशांतने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

Updated: Jun 13, 2021, 08:59 AM IST
सुशांत आणि अंकिता प्रेमात हरवले; पाहा कधीही न प्रदर्शित झालेला हा व्हिडिओ

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेत या जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या आत्महत्तेनंतर सतत त्याचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड आंकितासोबत असलेले त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहेत. त्याला करण देखील तसचं आहे. अंकिता आणि सुशांतने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रेक्षकांनी या जोडीला तुफान डोक्यावर घेतलं. अशात  सुशांत आणि अंकिताचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'पवित्र रिश्ता' मालिकेतील आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. एकमेकांच्या प्रेमात हरवलेल्या अंकिता आणि सुशांत हे गाणं कधीचं प्रदर्शित झालं नाही. पण आज मात्र हे गाणं तुफान व्हायरल होत आहे.  झी म्यूझीक कंपनीने त्याचा कधीही न प्रदर्शित झालेला व्हिडिओ यूट्यूब वर शेअर केला आहे. 

सुशांच्या आत्महत्येनंतर त्याची हत्या की  अत्महत्या असा मुद्दा उभा राहिला होता. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी CBI चौकशीची मागणी केली. आता दखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर आले होते.