Sushant Singh Rajput Birth Anniversary : 'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त..,' Kiara Advani ने केला धक्कादायक खुलासा

Sushant Singh Rajput : आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपल्यामध्ये नाही, पण त्याचा आयुष्यातील एका गुपितबद्दल Kiara Advani सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

Updated: Jan 21, 2023, 10:54 AM IST
Sushant Singh Rajput Birth Anniversary : 'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त..,' Kiara Advani ने केला धक्कादायक खुलासा title=
Sushant Singh Rajput Birth Annversary Kiara Advani made a shocking revelation about Sushant used to sleep only for two hours

Sushant Singh Rajput Birth Anniversary : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज आपल्यामध्ये नाही. पण त्याचा दमदार अभिनयामुळे जो आजही आपल्या स्मरणात आहेत. 'एमएस धोनी' ते 'केदारनाथ' पर्यंत प्रत्येक चित्रपटात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सुशांत आपल्यासोबत असता तर आपण त्याचा 37व्या वाढदिवस साजरा केला असता. पण त्याचा अचानक जाण्यामुळे चाहत्यांना एकच धक्का बसला. 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतने 'काई पो चे' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. पण 2016 मध्ये सुशांतच्या करियला टर्निंग पॉइंट मिळाला. महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' अभिनेत्याचा अभिनयाने सर्वांच्या मानता आपली वेळी जागा निर्माण केली. याच चित्रपटात कियारा अडवाणी हिने काम केलं. कियाराने सुशांतच्या आयुष्यातील एक गुपित सांगितलं आहे. 

'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त...'

एमएस धोनी: द स्टोरी अनटोल्ड सह-अभिनेत्री कियारा अडवाणीने एका मुलाखतीत सुशांतच्या आयुष्यातील एक खुलासा केला आहे.  सुशांत हा निद्रानाशाचे शिकार होता. सुशांत रात्री फक्त दोन तास झोपायचा. विशेष म्हणजे हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण कियारा म्हणाली की, तो कधीही सेटवर थकलेला दिसला नाही.  कियारा अडवाणी एकदा YouTuber रणवीर अल्लाबदिया उर्फ ​​बीयरबिसेप्स चॅनलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने हे गुपित सांगितलं. (Sushant Singh Rajput Birth Annversary Kiara Advani made a shocking revelation about Sushant used to sleep only for two hours)

असा झाला सुशांतचा मृत्यू 

सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या वांद्रेमधील घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केली असं प्रथमदर्शी म्हटल्या गेलं. सुशांतच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय करत आहे. एजन्सीने यापूर्वी हत्येची शक्यता फेटाळून लावली असली तरी क्लोजर रिपोर्ट अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक तर्क लावले जातं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

मोठ्या मनाचा माणूस!

सुशांतच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 'शुद्ध देसी रोमान्स' 'पीके' 'राबता' 'केदारनाथ' 'सोनचिरिया'  'छिछोरे'मध्ये त्याचा अभिनयाची प्रशंसा झाली. तर सुशांतच्या मृत्यूनंतर 'दिल बेचारा' हा शेवटचा चित्रपट ठरला. सुशांत हा एक मोठ्या मनाचा माणूस होता असं म्हणतात. कारण  राजकुमार हिरानी यांच्या पीके या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये घ्यायचा. मात्र या चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याने राजकुमार हिराणीकडून एकही पैसा घेतला नाही. नंतर राजकुमार हिरानी यांनी सुशांतला 21 रुपये शगुन म्हणून दिले.