Sushant Singh Rajput Case : ईडीकडून सुशांतच्या CAची चौकशी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी...

Updated: Aug 3, 2020, 10:54 PM IST
Sushant Singh Rajput Case : ईडीकडून सुशांतच्या CAची चौकशी title=
संग्रहित फोटो

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सुशांतच्या अनेक चाहत्यांकडून तसंच इंडस्ट्रीतील अनेकांकडूनही सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ED दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चार्टर्ड अकाऊंटेंटशी CA सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली. सुशात सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहार पोलिसात Bihar Police तक्रार दाखल केली होती. त्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप श्रीधर यांची मुंबईतील एजन्सीमार्फत चौकशी करण्यात आली. मनी लाँड्रिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सीए जवळपास एक वर्षापासून सुशांतच्या आर्थिक खात्यांचा हिशोब पाहत होते. चौकशी पुढे नेण्यासाठी ईडीला सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबाबत संपूर्ण माहितीचा तपशील जाणून घ्यायचा आहे. 

ईडीने गेल्या आठवड्यात बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी झाली. एफआयआरमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला आहे की, रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. 

सुशात सिंह राजपूतशी संबंधित दोन कंपन्या आणि रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोविक यांचा समावेश असलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणांवरही ईडीची नजर आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत अशा आरोपींविरुद्ध ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. यात रिया चक्रवर्ती, तिचं कुटुंब आणि इतर सहा नावं आहेत. मुंबई पोलीस तसंच बिहार पोलिसांकडूनही सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरु आहे. पोलीस तपासातून दररोज अनेक नव्या गोष्टी समोर आहेत.