close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉयफ्रेंडसह सुट्ट्यांचा आनंद घेतेय सुष्मिता

सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात.

Updated: Jul 22, 2019, 07:17 PM IST
बॉयफ्रेंडसह सुट्ट्यांचा आनंद घेतेय सुष्मिता

मुंबई : सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनसुद्धा सोशल मीडियावर  अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सुष्मिता सेन तितक्याच उत्साहाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते. सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमान यांच्यातील नाते सध्या तिच्या चाहत्यांसाठी महत्वाचा विषय ठरला आहे.

सध्या सुष्मिता तिच्या मुली आणि बॉयफ्रेंडसह अर्मेनियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने या आनंददायी क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत .