सुष्मिता सेन 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात; मग नातं का तुटलं? 

 बॉलीवूड आणि क्रिकेटचा संबंध खूप खास आहे. 

Updated: Apr 25, 2022, 06:18 PM IST
सुष्मिता सेन 'या' पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात; मग नातं का तुटलं?  title=

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटचा संबंध खूप खास आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत जे बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात होते आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं. या यादीत विराट-अनुष्का, हरभजन सिंग-गीता बसरा अशी अनेक नावं आहेत. पण अशीही अनेक जोडपी आहेत ज्यांचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचलंच नाही.

सुष्मिता सेन आणि वसीम अक्रम यांची भेट कशी, केव्हा आणि कुठे झाली हे तुम्हाला माहीत आहे का? या दोघांची भेट एका डान्स रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. शोच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यांची चांगली मैत्रीही झाली. शोदरम्यान दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. वसीमचं आधीच लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.

रिपोर्ट्सनुसार, 2009 मध्ये दोघंही जवळ आले होते आणि ते लग्न करण्याचा विचार करत होते. दोघंही अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. पण दोघंही त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वसीम अक्रमच्या संशयास्पद स्वभावामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. जिथे सुष्मिता सेन फिल्मी दुनियेच्या ग्लॅमरस लाइफस्टाइलमध्ये व्यस्त असायची हे पाहून वसीमला स्वतःला असुरक्षित वाटू लागलं. यामुळे ते पुन्हा त्यांच्या नात्याच्या भविष्याचा विचार करू लागले.

सुष्मिता सेन आणि वसीम त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत. एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितलं होतं की, 'मला वसीम खूप आवडतो, पण याचा अर्थ असा नाही की, ज्या व्यक्तीसोबत माझी मैत्री आहे. त्यांच्यासोबत माझं अफेअर आहे. रिलेशनशिपमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

एका मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम म्हणाला होता की, 'मी या अफवांमुळे नाराज झालो आहे. माझ्या दोन्ही मुलांना वेळ द्यायचा असल्याने मी आयपीएलमधून एक वर्षाचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो मोठा होत आहे आणि त्याला त्यांच्या वडिलांची गरज आहे. सध्या मी माझं सगळा वेळ मुलांसोबत घालवण्यावर केंद्रित केला आहे. पुन्हा लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही.