सुयश टिळक गर्लफेंडबद्दल काय बोलतोय एेकलं काय?

मुंबई : गर्लफ्रेंड आहे का? हा पहिला प्रश्न नवी मैत्री झाली की असतोच. यात काही नाही. आणि गर्लफ्रेंड असल्यावर त्याबाबत असलेले अनेक प्लस आणि मायनस पॉईंट हे असतात. गर्लफ्रेंड असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. याबाबत आता अभिनेता सुयश टिळक जेव्हा मनभरून बोलतो तेव्हा. 

सुयश टिळक देखील त्याचं मत व्यक्त करतोय जे प्रत्येकाला आवडेल आणि आपल्याच मनातील बोलतोय हे प्रत्येक मुलाला वाटेल. पण सुयश नक्की का सांगतोय आपल्याला हे पण सविस्तर आपल्याला लवकरच कळणार आहे. २० मे ला विनोद गायकर लिखित – दिग्दर्शित. ‘ग’ गर्लफ्रेंड वेबसिरिज रिलिझ होतेय. #गGirlfriend #Shotput #Shotputfilms   

कोण आहे सुयश टिळकची गर्लफ्रेंड 

छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरात ‘पाठकबाईं’च्या नावाने ओळख निर्माण केली.‘का रे दुरावा’ मालिका फेम सुयश टिळक आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारा प्रत्येक जण अनेक क्षण इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून शेअर करत असतो. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे मराठी कलाकारही आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सुयश आणि अक्षयासुद्धा यामध्ये मागे नाहीत.

इन्स्टाग्रामवर दोघेही बऱ्याचदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना पाहायला मिळतात. यामध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अक्षयाच्या हातातली अंगठी. तिच्या हातातील हिऱ्याची मोठी अंगठी पाहून दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा आहे. नवीन वर्षात त्यांनी आपल्या नात्याला एक पाऊल पुढं नेण्याचा विचार करत साखरपुडा केला की काय, असं म्हटलं जात होतं.