Swara Bhaskar Marriage: अनेकदा वादांमध्ये सापडलेली अभिनेत्री स्वरा भास्कर अखेर विवाहबंधनात (Swara Bhaskar Marriage) अडकली आहे. नेपोटिझम, जेएनयूवरील वाद या सगळ्यांमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा सहभाग राहिला आहे त्यातून अनेक राजकीय वादांमध्येही स्वरानं आपली मतं प्रदर्शित केली आहेत. त्यामुळे स्वरालाही अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. बॉलिवूडमध्येही आगळ्यावेगळ्या अभिनय शैलीसाठी (Fawad Ahmad) ती ओळखली जाते. मध्यंतरी मीटू प्रकरणावरूनही तिनं समाजमाध्यमांतूनही मतं मांडली होती.
अभिनेत्रा स्वरा भास्करनं आपला प्रियकर आणि समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद एहमद यांच्या गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. खुद्द स्वरानं याबद्दल इन्टाग्राम पोस्टवरून माहिती दिली आहे. सध्या तिच्या या इन्टाग्राम पोस्टवर अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींच्या कमेंट्स (Swara Bhaskar Tweet) येत आहेत.
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) February 16, 2023
अभिनेत्री स्वरा भास्करनं आपल्या इन्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. स्वरा भास्करने एका बातमीचा स्क्रिनशॉट ट्वीटरवर शेअर केला होता. ज्यात दीपिका आणि शाहरुख यांच्या गाण्यावरून सुरू झालेल्या वादानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला होता. स्वरा भास्करने यावरून नरोत्तम मिश्रा यांना त्यांचे नाव न घेता टोला लगावला होता.
देशातील विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडण्यासाठीसुद्धा बॉलिवूड कलाकार ओळखले जातात. समाजिक भान जपत, या समाजाप्रती आपलंही काही देणं आहे याची जाण राखत काही कलाकार मंडळी कायमच त्यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. अशाच कलाकारांच्या यादीत येणाऱ्या एका अभिनेत्रीनं तिच्या ट्विटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
एक हिंदू असल्याची लाज वाटते.... असं म्हणणारी अभनेत्री आहे स्वरा भास्कर (Swara Bhaskar). स्वरानं एक व्हिडीओ रिट्विट केला होता. जिथं लोकांचा एक घोळका ‘जय श्री राम’चे नारे चढ्या स्वरात बोलताना दिसत होती. याच व्हिडीओला अनुसरून तिनं आपल्या हिंदू असल्याची लाज वाटत असल्याचं स्पष्ट केलं होतं. यावरुन तिची बरीच खिल्ली उडवली जात आहे, तर चाहत्यांची एक फळी स्वराच्या बचावासाठी धावून आलेही होते.
नमाज वाचणाऱ्यांसमोर दिले जाणारे जय श्रीरामचे नारे पाहून स्वराचा संताप अनावर झाला होता. हे पाहूनच तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या.