स्वरा भास्कर सोबत सेल्फी घेताना चाहता म्हणतो 'येणार तर मोदीच'

 हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. 

& Updated: May 9, 2019, 11:49 AM IST
स्वरा भास्कर सोबत सेल्फी घेताना चाहता म्हणतो 'येणार तर मोदीच' title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचलाय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या मागे लागलेयत. सर्वजण आपापल्या जातीय, धार्मिक, वैचारीक रंगांची उधळण करताना दिसत आहेत. आता राजकारणाची रंगपंचमी सुरुच आहेत तर त्यात सेलिब्रेटी देखील आपापले रंग भरताना दिसतयात. शत्रुघ्न सिन्हा कधी अबे घामोश म्हणत विरोधकांना शांत करतायत. सनी देओल गदरचा हॅंडपंप हातात घेऊन देशभक्तीची शिकवण देतोय. तिकडे गौतम गंभीर पंतप्रधानांच्या भाषणाची ओपनिंग करतोय..असं देशभरात काही ना काही सुरू आहे... अभिनेत्री स्वरा भास्कर आजकाल बेगूसरायमध्ये निवडणूक लढत असलेल्या कन्हैया कुमार याचा खूप प्रचार करतेय. मोदी सरकारच्या धोरणांवर ती नेहमीच स्पष्टपणे आपले विचार मांडत असते. त्यामुळे मोदी सरकारसाठी ही डोकेदुखी ठरली आहे. नुकतीच स्वराची गाठ एका अजब फॅन सोबत पडली. त्यानंतर स्वरा भडकलेली दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. 

त्याचं झालं असं की स्वरा एअरपोर्ट असताना एक तरुण तिच्याजवळ आला आणि सेल्फीसाठी विचारु लागला. आता सेलिब्रेटी म्हटल्यावर सेल्फी तो बनता है..सो..स्वराने पण काही आढेवेढे न घेता पाऊट केला आणि सेल्फी देऊ लागली..पण गंमत अशी झाली हा पोरगा तिच्या अभिनयचा फॅन असला तरी मोदींच्या राजकारणाचा देखील फॅन होता...पण हे कळायला स्वराला थोडा उशीरचं झाला. हा..तर...त्या फॅनने आपल्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेरा सुरु केला..स्वत:सोबत स्वरालाही त्यात सामावून घेतलं...स्वरानेही स्माईल दिली पण या तरुणाने फोटो ऐवजी व्हिडीओ बनवला. येणार तर मोदीच असं तो हळूच म्हणाला. त्यानंतर स्वराची ही स्माईल थोड्या सेकंदासाठीच होती.. त्यानंतर तिचा चेहरा फक्त लालच झाला होता...हे मोदीभक्तांच घाणेरड राजकारण असल्याचं स्वराने म्हटले..मी या सर्वामुळे अजिबात हैराण होत नाही तर भक्तांचे जीवन सार्थकी लावण्याचा मला आनंद मिळतो असे ती म्हणाली...

स्वराने बेगूसरायमध्ये कन्हैया कुमारचा नंतर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार केला. आता ती दक्षिण दिल्लीतील आम आदमी पार्टीचे उमेदवार राघव चढ्ढा यांचा प्रचार करणार आहे. तिने सोशल मीडियात यासंदर्भात माहिती दिली. राजस्थान शहरामध्ये स्वराने शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणले. शेतकरी आत्महत्या, गो हत्या अशा मुद्द्यांवरून तिने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.