सारा अली खानही स्वस्त कपड्यांमुळे चर्चेत

हा गाऊन ग्लोबल देसीचा असून सर्वसामान्यांच्याही बजेटमध्ये बसणारा ड्रेस आहे.

Updated: May 9, 2019, 11:07 AM IST
सारा अली खानही स्वस्त कपड्यांमुळे चर्चेत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या स्टाईलमुळे अशा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. सारा अली खान तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. इतर कलाकारांप्रमाणे साराही वेगवेगळ्या डिझाइन्सचे कपडे परिधान करत असते. परंतु सध्या सारा तिच्या अशा कपड्यांमुळे चर्चेत आहे ज्याची किंमत अतिशय कमी आहे. 

साराचा टील गाऊन घातलेला एक लुक व्हायरल झाला आहे. या गाऊनवर नारंगी रंगाची डिझाइन आहे. साराने घातलेला हा ड्रेस अतिशय स्वस्त असून ऑनलाईन त्याची किंमत २४९९ रुपये असल्याचं बोललं जात आहे. साराने या ड्रेससोबत नारंगी रंगाच्या बांगड्या आणि नारंगी रंगाचे मोजडी घातले आहेत. हा गाऊन ग्लोबल देसीचा असून सर्वसामान्यांच्याही बजेटमध्ये बसणारा ड्रेस आहे. साराने घातलेल्या या स्वस्त ड्रेसमुळे सारा पुन्हा चर्चेत आली आहे. 

 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

याआधी करिना कपूरनेही स्वस्त ड्रेस घातल्याचा फोटो व्हायरल झाला होता. करिनाने परिधान केलेल्या एच अॅन्ड एम ब्रॅन्डच्या ड्रेसची किंमत १४९९ रुपये इतकी होती. 

गेल्या वर्षी सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आलेल्या 'सिम्बा' चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंहसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसेच सारा आगामी इम्तियाज अली यांच्या 'लव आजकल २' या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सारा वरुण धवनसह 'कुली नंबर १' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.