'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे. 

Updated: Sep 11, 2022, 03:00 PM IST
'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप title=
swara bhasker blame shahrukh khan for love life

Swara Bhasker Accused Shahrukh Khan: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. कलासृष्टीत असो वा समाजात घडणाऱ्या गोष्टी स्वरा त्यावर नेहमी भाष्य करते. स्वराचं बिनधास्त व्यक्त होणं कायम तुला वादात पाडतात. सोशल मीडियावर (Social Media) ती कायम ट्रोल (Troll) होतं असते. स्वरा ही स्पष्ट आणि न घाबरता आपल्या मनातील गोष्टी समाजासमोर मांडते. तिच्या याच स्वभावामुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 यावेळी स्वरा भास्करने बॉलिवूडमधील (Bollywood) टॉपच्या अभिनेत्यावर घणाघाती आरोप केला आहे. या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे. झालं असं की, मिडडेशी संवाद साधताना स्वराने आपल्या लव्ह लाइफबद्दल मतं व्यक्त केलं. (swara bhasker blame shahrukh khan for love life)

शाहरुख खानने माझं लव्ह लाइफ...

स्वरा म्हणाली की,'माझं लव्ह लाईफ उद्ध्वस्त करण्यासाठी आदित्य चोप्रा (Aditya Chopra)सर आणि शाहरुख खानला (Shahrukh Khan) जबाबदार धरते. शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट मी तरुण वयात पाहिला आणि तेव्हापासून मी त्या 'राज' च्या शोधात आहे, जो हुबेहुबे शाहरुखसारखा दिसतो आणि तो 'राज' असले. मात्र खऱ्या आयुष्यात 'राज'सारखा कोणी नाही,हे समजायला मला बरीच वर्षे लागली.'

'त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फारसा चांगला नाही, असं मला वाटतं. सिंगल लाईफ कठीण असून जोडीदार शोधणे म्हणजे हे कचरा गाळून घेण्यासारखं आहे,' असंही यावेळी स्वरा म्हणाली. स्वरा आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत तीने हे वक्तव्य केलं. स्वराचा 'जहां चार यार' (Jahan Chaar Yaar ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वरासोबत अभिनेत्री पूजा चोप्रा (Pooja Chopra), शिखा तलसानिया (Shikha Talsania) आणि मेहर विज (Meher Vij) देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.वुमन सेंट्रिक हा चित्रपट 16 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.