स्वरा भास्करने सांगितलं तिच्या नवऱ्याच्या खऱ्या बायकोचं नाव, पोस्ट करत म्हणाली माझी सवत...

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. अताही ति तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळं चर्चेत आहे. 

Updated: May 26, 2023, 07:23 PM IST
स्वरा भास्करने सांगितलं तिच्या नवऱ्याच्या खऱ्या बायकोचं नाव, पोस्ट करत म्हणाली माझी सवत...  title=
Swara Bhasker reveals she has sautan see her viral post

Swara bhasker Post: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara bhasker ) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्नगाठ बांधली. लग्नानंतर स्वरा भास्करने एक इन्स्टाग्राम (Swara Bhasker Instagram) पोस्ट टाकली आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. तर, पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे. स्वराने पोस्ट करत तिच्या सवतीबाबत माहिती दिली आहे. स्वराच्या पोस्टवर अनेकांनी मजेदार कमेंटही केल्या आहेत. 

स्वरा भास्कर पोस्ट

स्वरा भास्कर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. राजकारणावर प्रतिक्रिया असो किंवा तिच्या खासगी आयुष्यातील काही क्षण असो ती नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असते. अलीकडेच तिने केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. यात स्वराने तिच्या पतीच्या म्हणजेच फहद अहमदच्या खऱ्या बायकोचा उल्लेख केला आहे. इतकंच नव्हेतर वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पण स्वराने असा उल्लेख करण्यामागचं कारण कळताच तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वराने इन्स्टाग्रामवर आणि ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती तिच्या पतीच्या खऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. आता ती खरी पत्नी म्हणजेच फहदचा जीवलग मित्र आहे. स्वराने फहादचा बेस्ट फ्रेंड अरीश कमरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळीच तिने त्याची खरी पत्नी असा उल्लेख केला आहे. 

सवतीसोबत फोटो शेअर

स्वराने वाढदिवसाचे फोटो शेअर करताना मजेशीर कॅप्शन लिहलं आहे. आमचे मित्र, कॉमरेड आणि फहादचा खरा जीवनसाथी अरीश कमरला जन्मदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छाय नेहमीच आमची साथ देण्यासाठी आणि सुरुवातीपासून आमच्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद. आम्ही कोर्टात कादगपत्रे नीट जमा केलीयेत की नाही याची खातरजमा करण्यापर्यंत ते आमच्या नात्याचे साक्षीदार होण्यापर्यंत व आत्तापर्यंतची सर्वात बेस्ट सवत होण्यासाठी धन्यवाद, असं स्वराने लिहलं आहे. 

जवळचे मित्र

अरीश कमर आणि फहद अहमद खूप जवळचे मित्र आहेत. स्वरा आणि फहदच्या लग्नात तो मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. मग ते कोर्ट मॅरेज असो किंवा लग्नाचे इतर फंक्शन अरीश सर्व कार्यक्रमात सहभागी झाला होता. इतकंच नव्हे, तर, स्वरा-फहदच्या कोर्ट मॅरेजच्यावेळी साक्षीदार म्हणूनही त्याने सही केली होती. स्वरा भास्कर आणि फहद अहमदने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली होती. फहद अहमद समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे.