मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर मिका सिंह सध्या त्याच्या 'स्वयंवर - मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये मिका त्याच्या भावी वधूच्या शोधात दिसणार आहे. या नवीन शोबाबत बोलताना त्याने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
'स्वयंवर - मीका दी वोटी' या नवीन शोमधून मिका सध्या पडद्यावर येणार आहे. या शोमध्ये मिका त्याच्या भावी वधूच्या शोधात दिसणार आहे, तर मिकाचा जवळचा मित्र शान हा या शोचा होस्ट असणार आहे. या दोघांची जोडी हा शो किती हिट ठरवत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मिकाने सांगितला किस्सा
मिका आणि शान या दोन्ही दिग्गज सिंगरमध्ये एक खूप चांगले बॉन्ड आहे. ही गोष्य इंडस्ट्रीत फार कमी लोकांना माहिती आहे. दरम्यान याचं नवीन शोनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मिकाने अनेक किस्से सांगितले आहेत.
मिका सांगतो की, बॉलिवूडमध्ये सिंगिंग क्षेत्रात ज्यावेळेस तो स्ट्रगल करत होता. त्यावेळेस शानने त्याला एक सल्ला दिला होता. हा सल्ला असा होता की, महागड्या कार ऐवजी ऑटोरिक्षाने प्रवास करत जा, तरचं तूला इंडस्ट्रीत काम मिळेल.
मिका पुढे सांगतो की, मी आलो तेव्हा शान मला सांगायचा, मोठ्या वाहनात येऊ नकोस, कारण इथे काम मिळत नाही. तु ऑटोने येत जा, मग लोक काम देतील. तो पुढे म्हणतो की, मला समजले की मला ही गोष्ट बदलावी लागेल. आणि त्यानुसार त्याने हा सल्ला मानला.
गायकांना संधी मिळायला हव्यात
गायक केवळ गाण्याच्या कार्यक्रमांमध्येच दिसले पाहिजेत असे नाही, तर त्यांना इतर ठिकाणीही संधी मिळायला हवी. “आज तुम्ही कोणताही रिअॅलिटी शो घ्या, त्यात तुम्हाला गायक नक्कीच दिसेल. त्या गायकाला जरी डान्स येत नसला तरी तो डान्सिंग शोला जज करतोय. आता गायक कॉमेडी शोमध्येही दिसतात. यातूनच मला गायक समुदायाला पुढे न्यायचे आहे असे तो म्हणतो.
पंजाबी गायकांना संधी मिळाल्याने मी खूप आनंदी असल्याचे मिका सांगतो. गायकाला केवळ पुरस्कारच नाही तर सन्मानही द्यायला हवा, असे मिका सिंहचे म्हणणे आहे.