स्वप्नील जोशीच्या मुलाचं नाव 'हे' ठेवलं?

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दुसऱ्यांदा बाबा झालाय. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 27, 2018, 12:17 AM IST
स्वप्नील जोशीच्या मुलाचं नाव 'हे' ठेवलं?  title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दुसऱ्यांदा बाबा झालाय. 

अभिनेता स्वप्नील जोशी आणखी एका बाळाचा बाबा झाला आहे. स्वप्नील जोशीच्या पत्नीने डिसेंबर महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. आज या बाळाचं बारसं करण्यात आलं. स्वप्नीलच्या चाहत्यांना उत्सुकता होतीच की बाळाचं नाव काय असणार? तर आज हे नामकरण सोहळा करण्यात आला. 

"राघव" असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. 6 वर्षापूर्वी लग्न झालेल्या स्वप्नील जोशीला मायरा नावाची मोठी मुलगी आहे. आणि आता राघव या दोन्ही बाळांमुळे स्वप्नील - लीनाचं घरं पूर्ण झालं आहे. या गोड बातमीमुळे दोन्ही कुटुंबासहित त्याच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही चाहते आणि इंडस्ट्रीतील कलाकारांकडून स्वप्नील आणि लीनावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

व्यवसायानं डेन्टिस्ट असलेली लीना आणि स्वप्नील यांचं ६ वर्षांपूर्वी लग्न झालं. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच स्वप्नीलच्या आईचा वाढदिवस असल्याने जोशी कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झालाय.

स्वप्निल जोशीला सात तारखेला मुलगा झाला.  स्वप्नीलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्नील आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून ती मूळची औरंगाबादची आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून ती आता दीड वर्षांची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब सध्या प्रचंड आनंदी आहे.