वादाचा पद्मावत चित्रपटाला प्रचंड फायदा

 करणी सेनेच्या हिंसक आंदोलनाचा गेल्या वर्षभरापासून सामना करणारा, संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 26, 2018, 11:17 PM IST
वादाचा पद्मावत चित्रपटाला प्रचंड फायदा title=

मुंबई : करणी सेनेच्या हिंसक आंदोलनाचा गेल्या वर्षभरापासून सामना करणारा, संजय लीला भन्साळींचा पद्मावत हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानं आतापर्यंत किती कमाई केली आहे.

'पद्मावत' सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

करणी सेनेच्या विरोधानंतरही 'पद्मावत' सिनेमाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला आहे. अनेक अडचणींना सामना करुन, अखेर पद्मावत हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित झाला प्रेक्षकांसाठी 24 जानेवारीच्या संध्याकाळीच पेड प्रीव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं. या पेड प्रीव्ह्यू शोमध्येच 'पद्मावत'ने पाच कोटींचा व्यवसाय केला.

पहिल्याच दिवशी सिनेमाला 50 ते 60 टक्के ओपनिंग 

'पद्मावत'चं एक तिकीट तब्बल 300 पासून 3 हजाराच्या घरात आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाला 50 ते 60 टक्के ओपनिंग मिळालं. विशेष म्हणजे करणी सेनेकडून होणा-या विरोधाची कुठलीही परवा न करता प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये चांगलीच गर्दी केली.

कलेक्शन 25 ते 30 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

पद्मावतचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 25 ते 30 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.. गुरुवारी चित्रपट रिलीज झाल्यामुळे सिनेमाला गुरुवार ते रविवार असा लाँग वीकेंड मिळालंय... त्यामुळे चार दिवसात हा सिनेमा 100 कोटींचा गल्ला पार करण्याची चिन्हं आहेत.

सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन

करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आलं. देशभरात मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन आहेत. त्यामुळे चार राज्यातील प्रदर्शन बंद राहिल्यास ‘पद्मावत’ सिनेमाच्या कलेक्शनवर थोडासा परिणाम होण्याची शक्यता आहे.

चित्रपट फेसबुकवर ऑनलाईन लीक 

दुसरीकडे, पद्मावत चित्रपट फेसबुकवर ऑनलाईन लीक झाला आहे. जवळपास साडेतीन लाख यूझर्सनी हा ऑनलाईन लीक झालेला सिनेमा पाहिल्यामुळे बॉक्स ऑफिसवर फटका बसण्याची भीती हा व्यक्त केली जातेय..त्यामुळे ह्या सगळ्या गदारोळात पद्मावत आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.