'TMKOC' मधील सहकलाकारांमध्ये भांडण, जेठालालकडून मोठा खुलासा

 काही कलाकारांनी प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही खाजगी कारणांमुळे या मालिकांचा निरोप देखील घेतला आहे.

Updated: Jul 27, 2021, 06:33 PM IST
'TMKOC' मधील सहकलाकारांमध्ये भांडण, जेठालालकडून मोठा खुलासा

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालं आहे. मुनमुन दत्ता, शैलेश लोढा या कलाकारांची नावे घराघरात पोहोचली आहेत. दयाबेन, जेठालाल आणि टप्पू यांच्या व्यक्तिरेखांला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. 

 काही कलाकारांनी प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही खाजगी कारणांमुळे या मालिकांचा निरोप देखील घेतला आहे.

 एका फॅमिलीप्रमाणे सेटवर वावरणाऱ्या या कलाकारांमध्ये नुकताच मतभेद झाल्याची चर्चा रंगली होती. तारक मेहता हे पात्र साकारणारा अभिनेता शैलेश लोढा आणि जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात होतं. काही आठवड्यांपूर्वी जेठालाल आणि टप्पू यांच्यात देखील ऑफ स्क्रिन भांडणं झाल्याची बातमी आली होती. 

या सर्व चर्चांनावर अखेर जेठालाल फेम अभिनेता दिलीप जोशी यांनी स्पष्टीकरण दिलंय. सोशल मीडियावर चर्चेसाठी या सर्व अफवा पसरवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आम्हा कलाकारांमध्ये कोणताही वाद झालेला नाही. या चर्चा ऐकून मला हसू आवरत नसल्याचं दिलीप जोशी यांनी म्हटलं आहे.