बेडकासोबत बसून, असे कपडे घालून राधिका कोणाला 'डराव' तेय?

चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री राधिका आपटे कायमच ओळखली जाते

Updated: Jul 27, 2021, 06:26 PM IST
बेडकासोबत बसून, असे कपडे घालून राधिका कोणाला 'डराव' तेय?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री राधिका आपटे कायमच ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्टही तितक्याच लक्षवेधी असतात यात वाद नाही. बॉलिवूडमधील ही प्रयोगशील अभिनेत्री सध्या तिच्या एका हटके अंदाजामुळे चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे राधिकानंच पोस्ट केलेला एक व्हिडीओ. 

चित्रीकरणादरम्यानचाच एक फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये ती चक्क स्वत:ची तुलना एका बेडकाशी करत आहे. 'सर्वजण एखाद्या प्राण्याप्रमाणे दिसतात. मी एका बेडकासारखी दिसते आणि तुम्ही?', असं कॅप्शन राधिकानं लिहिलं. 

आपल्या शेजारी असणाऱ्या बेडकाच्या पुतळ्याप्रमाणंच तिनंही नक्कल करण्याचा प्रयत्न करत ही पोस्ट शेअर केली. राधिकाच्या या फोटोवर दोन लाखांहूनही अधिक लाईक्स आहेत. शिवाय फॉलोअर्सनी तिच्या फोटोवर कमेंट्सही केल्या आहेत. 

राधिका सध्या वासन बाला यांच्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' या वेब सीरिजच्या कामात रुळली आहे. या सीरिजमध्ये हुमा कुरेशी, राजकुमार राव हे आघाडीचे कलाकाराही झळकणार आहेत. राधिकानं हल्लीच्याच तिच्या काही फोटोंमध्ये आगामी वेब सीरिजच्या सेटवरील माहोल आणि एकंदर वातावरणाचीही झलक सर्वांच्या भेटीला आणली होती.

चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या राधिकानं वेब विश्वातही आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळं ती खऱ्या अर्थाने हे विश्व गाजवतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.